Los Angeles Wildfires hollywood Landmark saam tv
Video

Los Angeles Wildfires : लॉस एंजलिसच्या वणव्यात हॉलिवूडचा लँडमार्क जळाला? व्हायरल फोटोंमागचं सत्य आलं समोर

अमेरिकेतील लॉस एंजलिसच्या जंगलात वणवा भडकला असून, हॉलिवूडचा प्रसिद्ध लँडमार्क खाक झाल्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. यामागचं सत्य आता समोर आलं आहे.

Nandkumar Joshi

अमेरिकेतील लॉस एंजलिसच्या वणव्यात हॉलिवूडचा लँडमार्क जळाल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र, त्यांची पडताळणी केल्यानंतर हे फोटो आणि व्हिडिओ एआय जनरेटेड असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लँडमार्क जळून खाक झाल्याचे वृत्त असत्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हॉलिवूड लँडमार्कपासून काही मैल अंतरावर आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. मात्र, त्यात लँडमार्क जळाला नाही. पुढचे काही दिवस वणवा पसरत राहिला तर लँडमार्कचंही नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील लॉस एंजलिसच्या जंगलात वणवा भडकला होता. या वणव्याची झळ आजूबाजूच्या रहिवासी वस्तीपर्यंत पोहोचली आहे. या आगीत शेकडो घरं जळून खाक झाली आहेत. तर वणवा वेगाने पसरत असून, खबरदारी म्हणून हजारोंच्या संख्येने नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT