Congress Protest at chhatrapati sambhaji nagar on water issue saam tv
Video

EXCLUSIVE VIDEO : संभाजीनगरात पाणीप्रश्न पेटला, काँग्रेस कार्यकर्ते पालिकेच्या गेटवर चढले

Congress Protest at chhatrapati sambhaji nagar : छत्रपती संभाजीनगरमधील पाणीप्रश्न पेटला. काँग्रेसनं महापालिकेच्या गेटवर आंदोलन केलं.

Nandkumar Joshi

रामनाथ ढाकणे | छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐन पावसाळ्यात पाणीप्रश्न पेटलाय. पाणीप्रश्नावरून काँग्रेसनं आंदोलन केलंय. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर महिला काँग्रेसने तीव्र आंदोलन केलं. या आंदोलनात महिला आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. महिला कार्यकर्त्यांनी निषेधाचे फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. महिलांनी हाती हंडे घेऊन महापालिका प्रशासनाच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शहरात टँकर माफिया वाढले असून, या टँकर माफियांवर कारवाई करा, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. दरम्यान, काही वेळानंतर हे आंदोलन अधिक तीव्र झाले. काही कार्यकर्ते महापालिकेच्या गेटवर चढले होते. त्यांनी पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करून संताप व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Health Tips : कडाक्याच्या उन्हातून घरी आल्यावर या चूका टाळाच, अन्यथा....

Wardha : आयकर अधिकारी असल्याचं सांगितलं, सर्च वॉरंट दाखवलं; वर्ध्यात प्राध्यपकाच्या घरात चोरट्यांची घुसखोरी

Iran - Israel War: दुबईत अडकलेल्यांच्या मदतीला धावणार सोनू सूद; म्हणाला तुम्ही कुठेही असाल, 'मला मॅसेज करा...'

Dried Lipstick: जुनी-सुकलेली लिपस्टिक कचऱ्यात फेकताय? टाकून देण्यापूर्वी पाहा री-युज करण्याची स्मार्ट टीप्स

Rashmika-Vijay Reception Photo : लाल भरजरी साडी अन् पांढरा शुभ्र धोती-कुर्ता; रश्मिका-विजयचा रॉयल लूक पाहून चाहत्यांना याडं लागलं

SCROLL FOR NEXT