पुणे पब, बार आणि ड्रग्ज प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आलीये. राज्य उत्पादन शुल्क अॅक्शन मोडवर आलं आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १७ भरारी पथकं तयार करण्यात आली आहे. या पथकांकडून पब आणि बारची झाडाझडती घेतली जाणार आहे. १४ भरारी आणि ३ विशेष पथकं यासंदर्भात कारवाई करणार आहेत. या कारवाईत ६९ बारचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ६ पब आणि बारचे परवानेही रद्द करण्यात आले आहेत. तसंच उर्वरित आस्थापनांवर कारवाई करण्यात येणार आहेत. ड्रग्ज प्रकरणावरून राजकीय नेत्यांमध्ये मागील काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनीही ड्रग्ज प्रकरणावर पुणे पोलिसांवर अनेक आरोप आणि खुलासे केले आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारवर यावर काय निर्णय घेणार? हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.