Cooler Electrocution Claims Three Lives in Amravati Village : अमरावतीमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. कुलरच्या शॉटमुळे एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये लक्ष्मण कासेकर यांच्या पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. शनिवारी रात्री अचलपूर तालुक्यातील चमक बुद्रुक गावात ही थरारक घटना घडली आहे. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, कुलरमध्ये शॉट सर्किट झाल्याने हा अपघात घडला. कुलरला हात लावताच तिघांना विजेचा जोरदार झटका बसला, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून, कुलरच्या शॉट सर्किटचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेने गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.