Election Commission orders probe after opposition exposes irregularities in Maharashtra voter lists. Saam Tv
Video

Election Commission Inquiry: महाविकास आघाडीच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाकडून चौकशीचे आदेश|VIDEO

Massive Voter List Discrepancies: विरोधकांच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. मतदार यादीतील अनियमिततेवर जिल्हाधिकाऱ्यांना तपास करण्याचे निर्देश देण्यात आले असून, नागपूरसह काही मतदारसंघांमध्ये चौकशी सुरू झाली आहे.

Omkar Sonawane

महाविकास आघाडी आणि इतर पक्षांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली होती, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा त्यांनी पुरावा देखील दिला होता. यानंतर पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे आणि जयंत पाटील यांनी अनेक भागांमध्ये मतदार यादी दाखवत निवडणूक आयोगाचा गलथान कारभार समोर आणला होता.

आता यानंतर मतदार यादीतील अनियमिततेच्या विरोधकांच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहेत. ज्या मतदारसंघांवर आरोप झाले आहेत, त्या ठिकाणांची तपासणी करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. नागपूरमध्ये एका घरात २०० मतदार नोंदवले असल्याचा आरोप तपासला असता, हे मतदार झोपडपट्टीतील असल्याचे स्पष्ट झाले. झोपड्यांवर स्वतंत्र घर क्रमांक नसल्याने सर्वांचे नाव एका घराखाली नोंदवले गेले होते. असा दावा करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT