Election Commission PC SaamTv
Video

Election Commision Press Conference : विधानसभेतही 'तुतारी' आणि 'पिपाणी'चा गोंधळ कायम ?; निवडणूक आयोगाने स्पष्ट केली भूमिका

Saam Tv

तुतारी आणि पिपाणी चिन्हामुळे लोकसभेला मोठा गोंधळ झाला होता. याबद्दल शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून तक्रार देखील करण्यात आली होती. पिपाणी हे चिन्ह गोठवण्यात यावं अशी पक्षाची मागणी होती. यासंदर्भात निवडणूक आयोग काय निर्णय घेणार आहे? असा प्रश्न पत्रकार परिषदेत विचारला गेल्यानंतर तुतारी आणि पिपाणी हे दोन्ही चिन्ह कायम राहणार असल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.

साम टीव्हीच्या प्रतिनिधीने पिपाणी आणि तुतारी या दोन्ही चिन्हामुळे लोकसभेत झालेल्या गोंधळाचा उल्लेख करत यावर काय निर्णय घेतला जाणार असा प्रश्न निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना निवडणूक आयोगाने म्हंटलं आहे की, 'शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने 2 मागण्या केल्या होत्या. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह लहान आहे, ते मोठं करण्याची पहिली मागणी होती. तर ट्रम्पेट म्हणजेच पिपाणी हे चिन्ह गोठवण्याची दुसरी मागणी त्यांनी केली होती. पहिली मागणी आम्ही मान्य केली असून आता त्यांचं तुतारी हे चिन्ह स्पष्ट आणि मोठं करण्यात आलं आहे. मात्र पिपाणी हे चिन्ह पूर्ण वेगळं आहे. या दोन्ही चिन्हांचा एकमेकांशी संबंध नाही, यात साम्य नाही. त्यामुळे त्याला आम्ही हात लावला नाही.' असं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे विधानसभेत पिपाणी आणि तुतारी हे दोन्ही चिन्ह कायम असणार असल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'मी स्वतः मराठा समाजाला आरक्षण देणार'; एकनाथ शिंदेंची जरांगेंच्या भूमिकेवर मोठं विधान

Walking Exercise : चालला तो जगला; थांबला तो संपला, वाचा महत्वाचे फायदे!

Neechbhang Rajyog: नीचभंग राजयोगामुळे चमकणार 'या' राशींचं नशीब; नवीन नोकरीसह बँक बॅलेन्सही वाढण्याचे योग

Ajit Pawar: राष्ट्रवादीमध्ये नाराजीनाट्य! काल ६०० कार्यकर्त्यांनी साथ सोडली, आज खंद्या समर्थाकाने दंड थोपाटले, अजित पवारांना इशारा!

Paras Mhambrey: मुंबई इंडियन्सचा मास्टरस्ट्रोक! रोहितचा विश्वासू ताफ्यात, टीम इंडियाला मिळवून दिला वर्ल्डकप!

SCROLL FOR NEXT