EKNAТH SHINDE ATTACKS CONGRESS saam tv
Video

तेव्हा तुम्ही पाकिस्तानला लव्ह लेटर लिहायचे; एकनाथ शिंदेंचा काँग्रेसवर घणाघात|VIDEO

Eknath Shinde Targets Congress: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील भाजपच्या ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’ आंदोलनात काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. ‘तेव्हा तुम्ही पाकिस्तानला लव्ह लेटर लिहायचे’, असा टोला लगावत शिंदेंनी फेक नॅरेटिव्ह, आणीबाणी आणि घटनात्मक संस्थांवरील आरोपांवरून काँग्रेसला सुनावले.

Omkar Sonawane

‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’च्या नावाखाली काँग्रेस, इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात फेक नॅरेटिव्ह पसरवत आहेत. १९७५ मध्ये आणीबाणी होती; तेव्हा नेते तुरुंगात, आणि माध्यमांवर बंदी होती. आज विरोधक जंतरमंतरवर आंदोलन करतात, मोर्चे काढतात, पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन करतात आणि तरी लोकशाही धोक्यात असल्याचा दावा करतात, असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ठाणे शहर भाजपच्या ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’ आंदोलनात बोलताना शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि घटनात्मक संस्थांवर संशय निर्माण करण्यावरून काँग्रेसला सुनावले. “न्यायव्यवस्थेवर दबाव आणणे, न्यायाधीशांच्या राजीनाम्याची मागणी करणे हा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान आहे,” असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२ आमदारांनी कमळ घेतलं हातात, पण अचानक घेतला यू-टर्न; म्हणाले भाजपमध्ये प्रवेश झालाच नाही, २४ तासांत नेमकं काय झालं?

Maharashtra News Live Update: शरद पवार दुष्काळी अरण गावाला आज भेट देणार

Crime: मित्रांकडून डान्सर तरुणीवर सामूहिक बलात्कार, वाढदिवसाच्या पार्टीला बोलावलं नंतर...

Relationship Tips : जर तो खरोखरच तुमच्यावर प्रेम करत असेल, तर मिळतात 'हे' ७ संकेत

Dengue Awareness : उत्तम फिटनेस असलेल्या लोकांनाही डेंग्यूचा धोका का असतो? जाणून घ्या लक्षणे आणि बचावाचे सोपे उपाय

SCROLL FOR NEXT