राज्यातील नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या विकासकामांना गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगराध्यक्षांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. हेडलाईन बनण्यापेक्षा लोकांची लाईफलाईन असा सल्ला देत त्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रातील 63 नगराध्यक्षांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी नगराध्यक्षांना कानपिचक्या दिल्या. कमी बोला काम जास्त करा, मीडियात चुकीची हेडलाईन देण्यापेक्षा लोकांची लाईफलाईन चांगली करण्याचे प्रयत्न करा, अशा सूचना शिंदेंनी दिल्या. यावेळी त्यांनी दुष्काळी भागात ताकदीने काम करण्याचे आदेशही दिले आहेत.
नागपूरमध्ये राज्यातील नगराध्यक्षांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिरानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी छोट्या शहरांच्या विकासासाठी विविध विभागांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नगरपालिकांच्या हद्दीत मुलांसाठी खेळाची मैदाने विकसित करण्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.