Chief Minister Devendra Fadnavis and Deputy CM Eknath Shinde during a crucial meeting on Mumbai BMC seat sharing at Varsha Bungalow. Saam Tv
Video

शिंदे-फडणवीसांमध्ये मुंबईसाठी २ तास खलबतं, १५० जागांवर एकमत, ४८ तासांत पहिली यादी येणार

Mumbai BMC Elections BJP Seat Sharing Final: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी रात्री उशिरा तातडीची बैठक पार पडली. जागावाटपावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता, भाजपची पहिली यादी ४८ तासांत जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Omkar Sonawane

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर महायुतीची तब्बल दोन तास बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रमुख नेत्यांसोबत स्वतंत्र बैठक घेत पालिका निवडणुकांचा आढावा घेतला. या बैठकीत प्रामुख्याने मुंबई महापालिकेवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेतील 227 जागांपैकी सुमारे 150 जागांवर महायुतीत एकमत झाले आहे. उर्वरित 77 जागांबाबत काल सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेत जवळपास 30 ते 35 जागांचा तिढा सुटला असून उरलेल्या जागांबाबत लवकरच आणखी एक बैठक घेऊन निर्णय घेण्याचे ठरल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. महायुतीकडून लवकरच जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती होणार; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Shilpa Shetty : सेम टू सेम! अक्षय खन्नाच्या गाण्यावर थिरकली शिल्पा शेट्टी; हुक स्टेप्सनं वेधलं लक्ष, VIDEO

लोकलमधील धोकादायक प्रवास आता इतिहासजमा होणार; रेल्वे प्रशासनाची अनोखी शक्कल|VIDEO

Maharashtra Live News Update: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार; या तारखेला करणार युतीची घोषणा

Rice And Diabetes: भात खाल्ल्यानं खरंच डायबेटिस होतो? २ अक्षरांचं उत्तर अन् मनातली शंका होईल काही मिनिटांत दूर

SCROLL FOR NEXT