eknath shinde  saam tv
Video

Eknath Shinde: सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाच्या अनुपस्थितीवर शिंदेंचा घणाघात|VIDEO

Eknath Shinde criticizes: पहलगम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दिल्लीत संसद भवनात बैठक बोलावली होती. या बैठकीत ठाकरे गटाचा एकही नेता उपस्थित नसल्याचे समजते.

Omkar Sonawane

पहलगाम येथील हल्ल्यानंतर मोदी सरकारद्वारे सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मोदी सरकारमधील काही महत्वाचे मंत्री आणि विरोधी पक्षातील अनेक नेते यामध्ये उपस्थित होते.

कॉँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह खासदार राहुल गांधी हे देखील उपस्थित होते. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर उपस्थित होते. मात्र ठाकरे गटाचा एकही खासदार उपस्थित नसल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीकास्त्र सोडले आहे. हेच काय राष्ट्र प्रेम, हेच काय महाराष्ट्र प्रेम? बाळसाहेबांचा नकली आवाज काढणाऱ्यांकडून काय अपेक्षा करणार असा टोला एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डायबिटीजमध्ये किवी खावा की नाही? रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी 'हे' फळ ठरेल फायदेशीर

RCB vs GT IPL 2026 Final: कोण जिंकणार आयपीएल २०२६चा कप? RCB आणि GT मधील महसंग्राम कुठे, केव्हा आणि कसा पहाल?

Maharashtra Farmer Loan : १० दिवसांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, राज्य सरकारची मोठी घोषणा

Actress Bath Video Leak: अभिनेत्रीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ लीक', टिव्ही शोमध्ये घडला भयानक प्रकार

Maharashtra News Live Update: 10 दिवसांत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार - मंत्री दत्ता भरणे

SCROLL FOR NEXT