Khadse-Bawankule Meet saam tv
Video

Maharashtra Politics: राजकीय हालचालींना वेग; एकनाथ खडसे बावनकुळेंच्या भेटीला, कारणही आलं समोर|VIDEO

Fresh Political Movement: सध्याच्या घडीला अनेक नेते हे भाजपच्या वाटेवर आहे, आता यातच भाजपमधूनच आपली राजकीय करिअरला सुरुवात केली असे नेते एकनाथ खडसे यांनी अचानक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे.

Omkar Sonawane

जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. यामुळे अनेकांच्या राजकीय भुवया उंचवल्या आहेत. एकनाथ खडसे यांनी तीन वर्षांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर त्यांनी भाजपवर अनेक गंभीर आरोप ही केले होते. मात्र त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना लोकसभा निवडणुकीत पुन्हा तिकीट मिळाल्यानंतर ते पुन्हा भाजपच्या वाटेवर होते.

त्यावेळी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची देखील भेट घेऊन आपण लवकरच स्वगृही परतणार असल्याचे सांगितले होते. परंतु त्यांचा पक्षप्रवेश हा भाजपच्याच स्थानिक नेत्यांनी न होऊ दिल्याचे वृत्त समोर आले होते. आता अचानक त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. मात्र ही भेट राष्ट्रीय महामार्गासाठी जागेच्या भुसंपादनाच्या संदर्भात घेतली असे समोर आले आहे. या दोघांमध्ये तब्बल 15 मिनिटे चर्चा झाली असून यामुळे विविध राजकीय तर्क वितर्क लढवले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक- मुंबई महामार्गावरील उड्डाण पुलावर कारला भीषण अपघात

SSC HSC Student: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; बोर्डाने घेतला मोठा निर्णय

Accident : हृदयद्रावक! काही दिवसांवर लग्न, पत्रिका वाटण्यासाठी जाताना भरधाव कारने चिरडले; नवरदेवासह दोघांचा मृत्यू

Ashok Kharat Case: अशोक खरातचं आणखी एक नवं कांड, उरणमध्ये ४ कोटींची जमीन फक्त ५८ लाखांत खरेदी

Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT