ED seals Dhirubhai Ambani Knowledge City and other prime Reliance Group properties in Mumbai and Delhi during ₹7,500 crore money laundering probe. Saam Tv
Video

अंबानींवरचा फास आवळला, मुंबई ते दिल्ली 7,500 कोटींची संपत्ती जप्त|VIDEO

Anil Ambani Under ED Scanner: ईडीने अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपवर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मोठी कारवाई करत मुंबई ते दिल्ली दरम्यान सुमारे ७,५०० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.

Omkar Sonawane

रिलायन्स ग्रुपचे संचालक अनिल अंबानी यांच्यावर ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. ईडीने आरोप केला आहे की, 'रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (RHFL) आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड (RCFL) यांनी उभारलेल्या सार्वजनिक निधीचे कथित वळण आणि मनी लॅांड्रीग करण्यात आले आहे.' या प्रकरणी ईडीने देशभरातील सुमारे ७,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त केली आहे.

जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये कोपरखैरणे येथील १३२ एकरवरील धीरूभाई अंबानी नॉलेज सिटी, मुंबईतील पाली हिल येथील घर, चर्चगेटमधील कार्यालय आणि नवी दिल्लीतील रिलायन्स सेंटर यांचा समावेश आहे. याशिवाय मुंबई आणि दिल्लीतील एकूण २९ फ्लॅट्सदेखील ईडीने सील केले आहेत. ही कारवाई सार्वजनिक निधीच्या गैरवापराच्या आरोपांवर आधारित असून, ईडी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कॅन्सर रुग्णांना लुटणारा बाबा, उपचारांच्या नावाखाली आर्थिक लुटीचा धंदा

Mango Popsicles Recipe: उन्हाळात फक्त आंबेच कशाला? झटपट करा थंडगार मॅंगो पॉप्लिकल्स, वाचा सोपी रेसिपी

Virat Kohli: बुलेटच्या वेगात चेंडू सीमेपार; टीम डेविडचा शॉट पाहून चक्रावला कोहली, विराटची रिअ‍ॅक्शन व्हायरल

Maharashtra News Live Update: राज्यात २० ते २२ एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता

Tips To Get Glowing Skin: महागड्या फेशियलला करा Bye! हळदीचा खास फेसपॅक देईल नैसर्गिक गुलाबी चमक

SCROLL FOR NEXT