Ashok Kharat controversy : Saam TV Marathi News
Video

मोठी बातमी! नाशिक, पुणे, नागपूरसह ईडीची ११ ठिकाणी छापेमारी, नेमकं कारण काय?

Ashok Kharat controversy : अशोक खरात प्रकरणात ईडीने नाशिक, पुणे आणि नागपूरमधील ११ ठिकाणी छापेमारी केली. आयकर विभागासोबत संयुक्त कारवाई करत आर्थिक व्यवहार आणि मालमत्तांची सखोल चौकशी सुरू आहे.

Namdeo Kumbhar

ED raids Nashik Pune Nagpur Ashok Kharat case : भोंदू अशोक खरातच्या प्रॉपर्टीची ED कडून सखोल चौकशी सुरू करण्यात येत आहे. पुणे, नागपूरसह नाशिकमध्ये ११ ठिकाणी ईडीनं छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिर, नाशिकचे कार्यालय आणि वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनीची ईडी अधिकाऱ्यांनी पाहणी केल्याची सूत्रांची माहिती आहे. SIT अधिकाऱ्यांसोबत ईडी पथकाची संयुक्त कारवाई सुरू झाल्याची माहिती आहे.

भोंदू अशोक खरात याच्या घरीही आयकर विभागाने छापेमारी केली. भोंदू अशोक खरात प्रकरणातील आर्थिक व्यवहार, मालमत्तांसंदर्भात आयकर विभागाकडून तपास सुरू आहे. नाशिकच्या तृप्ताबाला या बंगल्यात गेल्या तासाभरापासून आयकर विभागाचे दोन पथके तपास करत आहेत. आयकर विभाग आणि ईडीकडून संयुक्त रित्या कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, दुसरीकडे अशोक खरात याला तिसऱ्यांदा 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने अशोक खरात याला २० एप्रिलपर्यांत न्यायालयीन कोठडी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

झाड कोसळून आणखी दोघांचा मृत्यू; मुंबईकरांचा वाली कोण? मुर्दाड महापालिकेला कधी जाग येणार?

Pune School: पुणे, पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी

School Holiday: मोठी बातमी! ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह नवी मुंबईतील सर्व शाळांना उद्या सुट्टी

Pune News: कात्रज तलावाच्या कठड्यावरून खाली पडला, ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना

Maharashtra News Live Update: रत्नागिरी- चिपळूणच्या वाशिष्ठी नदीनं इशारा पातळी ओलांडली

SCROLL FOR NEXT