Earthquake News Saam Tv
Video

Earthquake News : छताचे पंखे, खुर्च्या हादरल्या; दिल्ली भूकंपाचं पाकिस्तान कनेक्शन, पाहा VIDEO

Rohini Gudaghe

मुंबई : दिल्ली-एनसीआरमध्ये आज भूकंपाचा जोरदार धक्का बसलाय. उत्तर प्रदेशपासून काश्मीरपर्यंत जमीन हादरल्याचं समोर आलंय. दिल्ली भूकंपाचं पाकिस्तान कनेक्शन जोडलं जातंय. दिल्लीतील या भूकंपाचा केंद्रबिंदू पाकिस्तानमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.८ मोजण्यात आली. पाकिस्तानमधील पेशावर, इस्लामाबाद आणि लाहोरमध्ये देखील आज भूकंपाचे धक्के बसले आहेत.

भारतामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, जम्मू-काश्मीरमध्ये जमीन हादरल्याचं समोर आलंय. आज दुपारी १२ वाजून ५८ मिनिटांनी हा भूकंप झाल्याचं सांगितलं जातंय. भूकंप झाला तेव्हा छताचे पंखे, खुर्च्या हादरल्याचं समोर आलंय. त्यामुळे अनेक लोक घराबाहेर पडले होते. या भूकंपाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या खाली ३३ किमी असल्याचं सांगितलं जातंय. भूकंप १०किलोमीटर खोलीवर होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : शरद पवार गटाकडे 1652 इच्छुकांचे अर्ज, देवळालीतून 62 सर्वाधिक इच्छुक

NABARD Recruitment 2024 : १० वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; ३५ हजर रुपये पगार अन् बँकेत नोकरी, आजच अर्ज करा

Mumbai News: केंद्रात, राज्यात तुमचे सरकार, छत्रपतींचे स्मारक का उभारले नाही? संभाजीराजे संतापले; मुंबईत हायहोल्टेज ड्रामा

Beed Crime : ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; फरार शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

Bigg Boss Grand Finale : 'तौबा-तौबा' अन् 'झापुक झुपूक'ची रंगणार जुगलबंदी; अभिजीत-सूरजचा जबरदस्त डान्स, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT