A 4.3 magnitude earthquake hits southern Iran’s Gerash region near strategic energy and uranium sites.  Saam Tv News
Video

Earthquake: इराणवर निसर्गाचा प्रकोप; युद्धाच्या भडक्यात अणू प्रकल्पांजवळ भूकंप

Earthquake In Iran : अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार दक्षिण इराणच्या गेराश प्रदेशात १० किमी खोलीवर ४.३ तीव्रतेचा भूकंप झाला. हा भूकंप प्रमुख ऊर्जा कॉरिडॉरजवळ आणि गचिन युरेनियम खाणीजवळ झाला.

Bharat Jadhav

युद्धाच्या भीषण आगीत होरपळत असणाऱ्या इराणवर आता निसर्गही कोपला आहे. इराणमधील 'गेराश' भागात ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असल्याची माहिती अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने दिली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू १० किलोमीटर जमिनीखाली होता. हा भाग दक्षिण इराणमधील महत्वाचे ऊर्जा प्रकल्प, बंदर आणि लष्करी तळांना जोडणाऱ्या एका महत्त्वाच्या कॉरिडॉरवर स्थित आहे. गचीन युरेनियम खाण या ठिकाणापासून साधारण १५०-१८० किलोमीटर अंतरावर आहे. ही इराणच्या युरेनियम स्त्रोतांपैकी एक महत्त्वाची खाण आहे. इराणचा 'बुशहर' हा अणुऊर्जा प्रकल्प देखील गेराशपासून २५०-३०० किलोमीटर अंतरावर नेऋत्तेला आहे. सुदैवाने या भूकंपामुळे अणुकेंद्रांचे नुकसान झाल्याची किंवा किरणोत्सर्गाची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. महत्वाचे म्हणजे दक्षिण इराणचा हा भाग, झाग्रोस पर्वतरांगांशी जोडलेला भाग, येथे जमिनीखालील क्षेपणास्त्र साठवणूक आणि प्रक्षेपण केंद्रे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा LPG गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने रिक्षाच्या गॅस पंपावर रांगा

Mango Rate Hike: अक्षय्य तृतीयेला आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर; किंमत वाचून धडकी भरेल

Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेचा दिवस गृहप्रवेशासाठी शुभ का?

Gold Bangles Designs: लग्नासाठी सोन्याच्या बांगड्या खरेदी करायच्यात? पाहा 'या' 5 लेटेस्ट डिझाईन्स

मोठी बातमी! भोंदू खरातच्या निकटवर्तीयाचा मृत्यू, समृद्धीवर कारचा चक्काचूर, नेमकं घडलं काय?

SCROLL FOR NEXT