mumbai local saam tv
Video

Mumbai Local: चाललंय काय? धावत्या लोकलमध्ये तरुणाकडून खुलेआम नशा, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल|VIDEO

Shocking Video:कल्याण-डोंबिवली रेल्वेस्थानकात मागच्या काही दिवसांपासून नशेखोरांचे प्रमाण वाढताना दिसत आहे, यामुळे पहाटे आणि रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Omkar Sonawane

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

कल्याण डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात गर्दुल्ल्यांचा वाढता वावर हा नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे .या गर्दुल्ल्यांकडून छेडछाड, हाणामाऱ्यांसारखे प्रकार होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे. रेल्वे पोलिसांकडून या गर्दुल्ल्यांविरोधात काही दिवसांपूर्वी कारवाई सुरू करण्यात आली. मात्र, आता कारवाई थंडावल्याचे दिसून येत आहे. लोकल ट्रेन मधील माल डब्यात एक तरुण दिवसाढवळ्या खुलेआम नशा करत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

एका तरुणाने हा व्हिडीओ अपलोड केला असून हा व्हिडिओ डोंबिवलीहुन सीएसटीकडे जाणाऱ्या एका लोकलमधला असल्याचा प्राथमिक माहिती आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये हा तरुण खुलेआम नशा करताना दिसतोय. एकूणच या घटनेमुळे आता गर्दुल्ल्यांचा वावर हा धावत्या ट्रेनमध्ये वाढला असल्याचे दिसून आल्याने प्रवासी वर्गामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. अशा गर्दुल्लांवर वेळीच कारवाई करावी अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT