Terror Attack saam tv
Video

Mumbai News: युद्धविरामानंतरही मुंबईत ड्रोन बंदी कायम|VIDEO

Mumbai Police: मुंबईमध्ये अजूनही ड्रोन उडवण्यास बंदी आहे. याबाबत मुंबई पोलिसांनी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Omkar Sonawane

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. या मोहिमेद्वारे अनेक मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

यानंतर पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे हल्ले सुरू करण्यात आले. मात्र भारतीय सैन्याने तात्काळ प्रत्युत्तर देत सर्व ड्रोन हाणून पाडले. या घटनांनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठ्या प्रमाणावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.

मात्र काही दिवसातच अमेरिकेने मध्यस्थी करत हा संघर्ष थांबवण्यासाठी युद्धविराम घडवून आणला. युद्धविराम जाहीर झाल्यानंतरही काही ठिकाणी सतर्कतेचा इशारा कायम आहे.

विशेषतः मुंबईसारख्या संवेदनशील भागात ड्रोन उडवण्यावर अजूनही बंदी लागू आहे. मुंबई पोलिसांनी इशारा दिला आहे की, बंदी असूनही कोणी ड्रोन उडवताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT