Andhericha Raja Saam Tv News
Video

Video: अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी ड्रेसकोड

Rachana Bhondave

Andheri Ganpati festival: अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव आला असून गणेश मंडळाकडून तयारी देखील जवळपास पूर्ण झाली आहे. मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. नवसाला पावणारा अंधेरीचा राजा हा यंदा राजस्थान येथील पाटवा हवेलीत विराजमान होणार आहे. मंडळाचे यंदाचे हे 59 वे वर्ष आहे. मंडळानं गणेश भक्तांना दर्शनासाठी एक ड्रेस कोड जारी केलाय. यामुळे वाद देखील होण्याची शक्यता आहे. हाफ पँट आणि शॉर्ट स्कर्ट परिधान करून येणाऱ्या भाविकांना अंधेरीचा राजा पाहण्यासाठी प्रवेश मिळणार नसल्याचं मंडळाकडून सांगण्यात आलंय. हाफ पँट आणि स्कर्ट परिधान करून येणार्‍या महिला व पुरुषांसाठी येथे लुंगी आणि फुल पँटही ठेवण्यात येणार आहे. हे कपडे परिधान करून भाविकांना बाप्पाचे दर्शन घेता येईल. हा नियम 15 वर्षांपूर्वी लागू करण्यात आला असून, तो दरवर्षी पाळला जात असल्याचं मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana News : उपवासाची भगर खाल्ल्याने विषबाधा; महिलांना उलटी. पोटदुखीचा त्रास, उपचारासाठी दाखल

Marathi News Live Updates : बीआरएसएसचे अनेक नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत; आज 'तुतारी' हाती घेणार

Bachchu Kadu : बच्चूभाऊंना विधानसभेच्या तोंडावर महायुतीकडून 'कडू' घास; एकमेव आमदार पळवला!

Viral News : रामाची भूमिका साकारणाऱ्या व्यक्तीला हार्ट अटॅक; मंचावरच सोडला जीव, धक्कादायक VIDEO

Pune Crime : पुणे हादरलं! वारज्यात घरात घुसून महिलेवर लैंगिक अत्याचार, शहरात संतापाची लाट

SCROLL FOR NEXT