Dombivli News Saam tv
Video

Dombivli News : मस्करी बेतली जीवावर; तिसऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू, CCTV व्हिडिओही आला समोर

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

डोंबिवली : साधी मस्करी एका महिलेच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. मित्रांसोबत मस्करी करताना एका महिलेचा तिसऱ्या माळ्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. डोंबिवली कल्याण शीळ रोडवर ही घटना घडली आहे. नगीनादेवी मंजिराम असे या घटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.

नगीना देवी ही महिला इमारतीमध्ये सफाईचे काम करत होती. ती पिसवली टाटा नाका परिसरात कुटुंबासह राहत होती. या महिलेच्या मृत्यू प्रकरणी नोंद करत पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. या मृत महिलेला एका मुलगा आणि एक मुलगी आहे. आज मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला आहे.

मस्करी करत असताना सहकाऱ्याचा हात लागून ही महिला तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली. या घटनेत महिलेचा मृत्यू झालाय. महिलेच्या मृत्यूने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onion News: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले; निर्यादीचा मार्ग मोकळा

Maharashtra News Live Updates : धुळ्यात बस आणि ट्रकचा भीषण अपघात, ५ प्रवाशांची प्रकृती गंभीर

Maharashtra Politics: काकांनी कापले दादांचे परतीचे दोर? शरद पवारांच्या पक्षात अजित पवारांना नो एण्ट्री? बड्या नेत्याची साम टीव्हीला मोठी माहिती

Arvind kejriwal : 'माझी ताकद 100 पटीने वाढली', १५६ दिवसांनंतर अरविंद केजरीवाल तुरुंगाबाहेर; कार्यकर्त्यांनी जल्लोषात केलं स्वागत, VIDEO

Assembly Election 2024 : हरियाणात 'आप' बिघडवणार काँग्रेसचा खेळ? केजरीवाल यांना जामीन मिळाल्याने का वाढली डोकेदुखी?

SCROLL FOR NEXT