Dombivli Fire news SAAM TV
Video

Dombivli Blast Update | डोंबिवली MIDC आग दुर्घटना प्रकरणात मोठी कारवाई, कंपनीच्या मालकाला नाशिकमधून अटक

Dombivli Fire News Update : डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीला लागलेल्या आगीच्या घटनेप्रकरणी कंपनीच्या मालकाला नाशिकमधून अटक केली आहे.

Nandkumar Joshi

डोंबिवली एमआयडीसीत अमुदान कंपनीला लागलेल्या आगीत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. पण हा आकडा वाढण्याची भीती आहे. तर जवळपास ६० हून अधिक जखमी झाले आहेत. या कंपनीतील रिअॅक्टरमध्ये स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेनंतर कंपनीचे मालक फरार झाले होते. त्यांना अटक झाली आहे. नाशिक पोलिसांनी मालक मालती मेहताला ताब्यात घेतले आहे.

या दुर्घटनेनंतर डोंबिवली एमआयडीसीतील धोकादायक कंपन्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या कंपन्या अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी होत आहे. तर सरकारदेखील यासाठी सकारात्मक आहे, असे त्यांच्या प्रतिक्रियांवरून दिसून येते. दुसरीकडे, विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात येत आहे. तर पोलिसांनीही तात्काळ कारवाई हाती घेतली होती. कंपनीच्या मालकांविरोधात गुन्हा नोंदवला होता. कंपनीचे मालक हे पसार झाले होते. पोलीस त्यांच्या मागावरच होते. अखेर नाशिक पोलिसांनी कारवाई करत, मालती मेहताला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Aditya Rajyog: मंगळादित्य राजयोग सक्रिय होताच पालटणार नशीब; धन, दौलत अन् प्रसिद्ध सर्व काही मिळेल

LSG Vs DC Highlight: दिल्ली कॅपिटल्सने लखनौला धूळ चारली; 6 गडी राखून मिळवला विजय

Thursday horoscope : आर्थिक चणचण जाणवेल, जुने मित्र भेटतील; ५ राशींच्या लोकांचा खडतर काळ संपेल

Ritu Tawde: 'जैनमुनींच्या आशीर्वादानं घसा ठीक झाला', मुंबईचे महापौर अंधश्रद्धेच्या आहारी?

युरियाचा काळाबाजार, शेतकरी बेजार; युरिया काळाबाजाराचा 'साम'वर पर्दाफाश

SCROLL FOR NEXT