Gokul Dairy announces ₹1 increase in cow milk purchase rate, bringing festive cheer to dairy farmers ahead of Diwali. Saam Tv
Video

Milk Price Increase: शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट! दूध खरेदी दरात तब्बल इतक्या रुपयांची वाढ|VIDEO

Gokul Dairy Milk Rate Hike For Farmers 2025: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाकडून दूध खरेदी दरात १ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

Omkar Sonawane

कोल्हापूर: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गाय दूध खरेदी दरात एक रुपयाची वाढ करण्यात आली आहे. गोकुळकडून ही गाय आणि म्हशीच्या दूध खरेदी दरात एक रुपयाची वाढ करण्यात आली असून दूध उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे दिवाळीचे मोठे गिफ्ट मिळाल्याची चर्चा आहे. 1 ऑक्टोबरपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. काल कर्ज रोख्यांच्या मुद्यावरून कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाविरोधात जोरदार मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये आंदोलक आणि पोलिसांची जोरदार झटापट झाल्याचे पाहायला मिळाले. आंदोलकांनी मोर्चात जनावरे आणल्याने एकच गोंधळ उडाला होता. गोकुळच्या संचालिका शौमिका महाडीक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhananjay Munde: मला मारण्यासाठी अडीच कोटींची सुपारी, जरांगेंच्या आरोपावर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Maharashtra Live News Update: जात पात पाहून मी कधी राजकारण केलं नाही - धनंजय मुंडे

Dry Lips Care: तुमचेही ओठ खूपच कोरडे होतायेत? या सोप्या टिप्स करा फॉलो

Budh Gochar 2025: डिसेंबर महिन्यात २ वेळा गोचर करणार राजकुमार बुध; 'या' ३ राशींच्या व्यक्ती होणार करोडपती

Lehenga Selection: लग्नसराईसाठी लेहेंगा खरेदी करायचा आहे? मग शॉपिंगला गेल्यावर 'या' गोष्टींची घ्या काळजी

SCROLL FOR NEXT