Overturned private travel bus near Chalisgaon on Dhule-Solapur Highway after driver lost control. saam tv
Video

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

Dhule Solapur Highway Travel Bus Overturn News: धुळे-सोलापूर महामार्गावर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावजवळ खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात. बस पलटी होऊन 6 प्रवासी जखमी, स्थानिकांच्या मदतीने मोठा अनर्थ टळला.

Omkar Sonawane

संजय महाजन, साम टीव्ही

जळगाव: पाचोऱ्याकडून गुजरातकडे जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्सचा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही ट्रॅव्हल्स थेट रस्त्याच्या कडेला पलटी झाली. हा अपघात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या गायरान फाट्याजवळ घडला. अपघातावेळी ट्रॅव्हल्समध्ये एकूण २२ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी सहा जण जखमी झाले असून त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर परिसरातील तरुणांनी धाव घेत जखमी प्रवाशांना बाहेर काढले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात पोहोचवले. स्थानिकांच्या या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले असून सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Suraksha Bima Yojana : मोदी सरकारची खास योजना; फक्त २० रुपयांत मिळतो २ लाख रुपयांचा विम्याचा लाभ, जाणून घ्या संपूर्ण माहिती

वर्किंग वूमनसाठी बेस्ट इयररिंग्स; वेस्टर्न टू एथनिक दोन्ही कपड्यांवर दिसतील भारी

Maharashtra News Live Update: सोनम वांगचुक यांच्या मागणीच्या समर्थनात बुलढाण्यात एक दिवशीय बैठा सत्याग्रह

Tharala Tar Mag: 'ठरलं तर मग'मध्ये सायलीच्या डोहाळ्यांसाठी अर्जुनची धावपळ; पण एका चुकीमुळे बाळावर ओढावणार मोठं संकट?

Bulldozer Action: थेट खासदाराच्या कार्यालयावरच बुलडोझर कारवाई; पाच मजली ऑफिस केलं जमीनदोस्त, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT