omraje nimbalkar  Saam tv
Video

नॉट रिचेबल ओमराजे निंबाळकरांचं लोकशन सापडलं; महत्त्वाची माहिती समोर

omraje nimbalkar news : नॉट रिचेबल ओमराजे निंबाळकरांचं लोकशन सापडलं आहे. ते पुण्यात असल्याची माहिती हाती आली आहे.

सागर आव्हाड साम टीव्ही पुणे

ठाकरेंच्या ६ फुटीर खासदारांच्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. फुटीर खासदारांचा संसदेत वेगळा गट देखील स्थापन झाला आहे. तर ठाकरे गटाने बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीला फुटीर खासदार हजर झाले नाहीत. त्यानंतर सर्व ६ खासदार नॉट रिचेबल आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर यांचंही नाव फुटीर गटात असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे पुण्यातच असल्याचा पुरावा समोर आला आहे. जगदीश फरताडे यांच्या फेसबुक पोस्टद्वारे पहिला फोटो समोर आला आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या समवेत राजे निंबाळकर हे देखील या फोटोमध्ये आहेत. २० तारखेला पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा अंतिम निकाल मुंबई उच्च न्यायालयात लागणार आहे. या निकालानंतर ओमराजे निंबाळकर त्यांची राजकीय भूमिका मांडणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : भीषण स्फोटाने खळबळ! पिंपरी-चिंचवड शहराचा वीजपुरवठा खंडित; पाहा नक्की काय घडलं

राजधानीत थरारक घटना! 5 मजली इमारत कोसळली; 50 हून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली

Maharashtra News Live Update: अंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसींचे लाक्षणिक उपोषण

Makeup Tips: मेकअप करताना 'या' ७ चुका टाळा! नाहीतर फ्लॉलेस लूकऐवजी चेहरा दिसेल विचित्र

Silk Saree: महिलांसाठी सिल्क साड्यांचे युनिक कलेक्शन, या 8 डिझाईन्स पाहून प्रेमात पडाल

SCROLL FOR NEXT