धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात १३१ नागरीक पुराच्या पाण्यात अडकले होते. प्रशासनाने तत्काळ हेलिकॉप्टरच्या सगळ्यात मोठं रेस्क्यू ऑपरेशन राबवून सर्व नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. देवगावातील ३४, नरसाळीत २२, वडनेरमध्ये २५, ढगपिंपरीतील १३, रुई चार दुधीतील १३ तर खासगाव कुंभार वस्तीत २० नागरिक अडकले होते. अचानक आलेल्या पुरामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ आणि स्थानिक बचाव पथकांच्या संयुक्त प्रयत्नांतून सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं. मात्र अजून काही जण पुराच्या पाण्यात अडकले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय. पुढील बचावकार्य वेगानं सुरू असून प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.