Dharashiv Drought  saam tv
Video

Drought : "पाणी नाही, चारा नाही, ५०% जनावरं मरणार"; धाराशिवमधील दुष्काळाचे विदारक वास्तव

धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग परिसरात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. तलाव, विहिरी आणि नद्या आटल्याने जनावरांसाठी पाणी आणि चारा मिळणे कठीण झाले आहे. ५० टक्के जनावरे दगावण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून, टँकर आणि चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली आहे.

Namdeo Kumbhar

Dharashiv Drought : धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग परिसरात दुष्काळाची तीव्रता वाढत असून, जनावरांच्या चारा आणि पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरे स्वतः जाऊन पाणी शोधू किंवा खड्डे खोदू शकत नसल्याने, शेतकऱ्यांसमोर आपले पशुधन जगवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. सकाळ समूहाचे संपादक निलेश खरे यांनी धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळाचे विदारक वास्तव कॅमेऱ्यासमोर मांडलेय. तेथील शेतकऱ्यांनी आपली व्यथा साम टीव्हीवरून मांडली आहे.

पाणी आणि चाऱ्याची टंचाई

धाराशिवमधील नळदुर्ग भागात सध्या तलाव, विहिरी आणि नद्या आटल्या आहेत. तुळजापूरवरून येणाऱ्या बोरी नदीतही पाण्याचा एक थेंब शिल्लक नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अद्याप या भागात टँकर आणि चारा छावण्या सुरू झालेल्या नाहीत. खड्ड्यांमधून उपसून जेवढे पाणी मिळते, तेवढ्यावर जनावरे भागवावी लागत आहेत. तसेच ज्वारीची पेरणी झालेली नसल्याने कडबा उपलब्ध नाही आणि गेल्या वर्षीचा कडबाही संपल्याचे स्थानिकांनी नमूद केले.

जनावरे विक्रीसाठी काढण्याचा प्रयत्न, पण खरेदीदार नाहीत

नळदुर्ग परिसरातील बबन हिरालाल सास्तुरे या शेतकऱ्याने परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत, पाणी आणि चाऱ्याअभावी यंदा ५० टक्के जनावरे दगावण्याची भीती व्यक्त केली. दुसरीकडे, गावातील सुमारे ४० ते ५० टक्के शेतकऱ्यांनी जनावरे विक्रीला काढली आहेत. मात्र, बाजारात जनावरे खरेदी करायला कोणीही तयार नाही. टेम्पोचे हजार-दोन हजार रुपये खर्च करून जनावरे बाजारात नेल्यानंतर ती विकली न गेल्याने पुन्हा घरी आणावी लागत आहेत.

दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याने बाजारात जनावरे खरेदी करणारेही मिळत नसल्याचे चित्र आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास पुढे पोळ्याला आणि सणासुदीला मातीचेच बैल व गायी कराव्या लागतील, अशी खंत व्यक्त करत शेतकऱ्यांनी सरकारने तातडीने मदत आणि उपाययोजना सुरू कराव्यात, अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये मध्यरात्री गोळीबाराचा थरार, एक जण जखमी

IAS Tukaram Mundhe : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार का? तुकाराम मुंढेंनी स्पष्ट शब्दातच सांगितलं, पाहा नेमकं काय म्हणाले?

Election: यूपी निवडणुकीत एकनाथ शिंदेंची एन्ट्री! ३५ जागांवर उमेदवार देण्याची तयारी; भाजपची डोकेदुखी वाढणार?

BJP MLA : मध्यरात्री थरार! भाजप आमदारांच्या ताफ्यातील २ गाड्यांना स्कॉर्पिओची जोरदार धडक; गाडी रस्त्यावर पलटली अन्...

Night Shift Health: सतत नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना हार्ट अटॅकचा धोका? नव्या संशोधनातून धक्कादायक बाब समोर

SCROLL FOR NEXT