Saam TV Ground Report 
Video

धाराशिवमध्ये नोव्हेंबरमध्येच तलाव कोरडे; पीक जळालं, जमीनही भेगाळली,'साम'चा ग्राऊंड रिपोर्ट

Saam TV Ground Report : धाराशिव जिल्ह्यात नोव्हेंबरमध्येच दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. नळदुर्ग आणि येडोळा परिसरातील तलाव कोरडे पडले असून सोयाबीन, ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Namdeo Kumbhar

Dharashiv Drought | Nilesh Khare : धाराशिव जिल्ह्यातील निळदुर्ग आणि येडोळा परिसरात दुष्काळाची तीव्र झळ जाणवू लागली आहे. पावसाअभावी तलाव पूर्णपणे कोरडे पडले असून त्याला भेगा पडल्या आहेत. अजून एप्रिल-मे महिना येण्यास बराच अवकाश असतानाच नोव्हेंबरमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी आणि पशुपालक मोठ्या संकटात सापडले आहेत.

दुष्काळी धाराशिवच्या येडोलामध्ये साम टीव्हीची टीम पोहोचली. याठिकाणी दुष्काळाचं चित्र अत्यंत भयावह आहे. पाण्याअभावी तलावाच्या तळाला भेगा पडल्यायत. त्यामुळे शेतीसह पशुधन कसं जगवायचं असा सवाल नळदुर्ग परिसरातल्या शेतकऱ्यांना सतावतोय. साम टीव्हीचे मुख्य संपादक निलेश खरे यांनी इथल्या शेतकऱ्यांशी बातचीत केली.

यंदा पाऊस न झाल्याने सोयाबीन आणि ऊस ही पिके वाळून गेली आहेत. सात एकर शेती असलेल्या एका शेतकऱ्याचे सोयाबीन पूर्णपणे वाया गेले असून लागवडीचा खर्चही निघालेला नाही. अडीच एकर क्षेत्रावर पेरणी केलेल्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या हाती काहीच आलेले नाही. त्याच्यावर बँकेचे ४ लाख रुपयांचे कर्ज असून, स्वतःच्या खाण्याची भ्रांत असताना कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. तीन एकर शेती असलेल्या शेतकऱ्याला केवळ चार कट्टे सोयाबीन मिळाले असून, उत्पन्न जवळपास शून्य असल्याचे त्यांनी सांगितले.

तलावात पाण्याचा थेंबही नसल्याने शेतकऱ्यांनी तलावात खड्डे खोदण्याचा प्रयत्न केला. मात्र, खड्ड्यात उतरून जनावरांना पाणी पाजणे धोकादायक असल्याने शेतकरी विद्युत पंपाच्या माध्यमातून खड्ड्यातील पाणी बाहेर काढून जनावरांना पाजत आहेत. स्वतःच्या कुटुंबासह जनावरे कशी जगवायची आणि दोन वेळचे पाणी कसे मिळवायचे, अशी चिंता व्यक्त होत आहे. तसेच, तलावात खड्डे मारल्यानंतर पाटबंधारे विभागाकडून ते बुजवले जात असल्याची तक्रारही शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईतील सर्व मैदाने आणि उद्याने महापालिकेच्याच ताब्यात राहणार

Election: जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटणार, भाजप मित्रपक्षांना किती जागा देणार? समोर आली महत्वाची अपडेट

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण, पण मागे हटता येईना! मंत्र्यांच्या कबुलीने खळबळ

Bigg Boss 20 : सलमान खानच्या 'बिग बॉस'मध्ये मोठा ट्विस्ट! 'हा' सदस्य घराबाहेर, टॉप १० मध्ये कोणाला मिळाली जागा?

Tilak Varma: तिलक वर्माच्या शतकानंतरही पराभवाची नामुष्की का ओढवली? टीम इंडियाचं नेमकं काय चुकलं, वाचा!

SCROLL FOR NEXT