Dhangad And Dhangar Issue SaamTv
Video

VIDEO : राज्यातला धनगड आणि धनगर वाद मिटला? मोठी अपडेट आली समोर

Dhangad And Dhangar Controversy : धनगड जात नसूनही राज्यात धनगड 6 दाखले देण्यात आले आहेत. त्यानंतर यावरून धनगर समाजाने हे दाखले रद्द करण्याची मागणी केली होती. त्याबाबत आता महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Saam Tv

राज्यात धनगड जातीचे सहा दाखले रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे आता राज्यातला धनगड आणि धनगर वाद मिटला आहे. धनगड जात नसूनही राज्यात धनगड जातीचे 6 दाखले देण्यात आले होते. मात्र हे दाखले बोगस असल्याचा आरोप धनगर समाजाकडून करण्यात आला होता. आता हे दाखले रद्द केल्याने धनगड आणि धनगर वाद मिटला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्य सरकारने धनगड समाज राज्यात अस्तित्वात नसल्याचं लिहून दिलं असतानाही संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात 6 धनगड जातीचे दाखले देण्यात आलेले होते. जात पडताळणी समितीला हे दाखले दिल्या नंतर रद्द करण्याचा अधिकार नाही. मात्र धनगर समाजाने मागणी लाऊन धरल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जात पडताळणी समितीला आदेशीत करून हे खोटे दाखले रद्द करण्यास सांगितले. त्यानंतर आता हे सहा धनगड जातीचे दाखले रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील धनगड आणि धनगर वाद संपुष्टात असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Somatic Yoga Benefits: पाठदुखी आणि सांधेदुखीवर रामबाण उपाय; घरच्या घरी करा सोमॅटिक योग, ही आहे सोपी पद्धत

Jalna Election: जालन्यात आचारसंहितेचा भंग, टोलनाक्यावर ९८ लाखांची रोकड जप्त, बॅगा भरून पैसे अन्...

Post Office Scheme : पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळवा ₹८२०००; कॅल्क्युलेशन वाचा

Crime News : आठवीच्या मुलाचे शाळेत भयंकर कृत्य, वॉशरूममध्ये वर्गमित्रावर लैंगिक अत्याचार, मुंबईतील धक्कादायक घटना

Maharashtra Election : महापालिकेच्या निवडणुकीत पैशांचा पाऊस, आतापर्यंत इतके कोटी जप्त, तर...

SCROLL FOR NEXT