Dhananjay Munde SaamTv
Video

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर CM फडणवीस, अजित पवार निर्णय घेणार?| Video

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजीनाम्याची मागणी धनंजय मुंडे यांच्याकडे केली जात आहे. त्यावर आज धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

Saam Tv

माझ्या राजीनाम्याच्या मागणीवर अंजली दमानिया काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटल्या आहेत. त्यानंतर यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार काय तो निर्णय देतील. मी यावर काहीही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. विरोधकांकडून संतोष देशमुख हत्येप्रकरणी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, विरोधकांना या प्रकरणाबद्दल सर्वात जास्त माहिती आहे. त्यामुळे आरोपींशी त्यांचेच जवळचे संबंध आहेत का? हे आता तपासलं पाहिजे. संदीप क्षीरसागर आणि आरोपी कृष्णा आंधळे याचे संबंध असतील, त्याशिवाय त्यांना एवढी माहिती कशी मिळाली. गेल्या दीड महिन्यापासून माध्यमांना देखील बीडशिवाय दुसरं काहीही दिसत नाही. माध्यमांनी काय खरं, काय खोटं हे आधी तपासलं पाहिजे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ज्यांनी केली असेल त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवलं गेलं पाहिजे, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT