Beed  
Video

Beed : विष्णू चाटेचा मोबाईल गायब एक षडयंत्र, धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप | VIDEO

विष्णू चाटेचा मोबाईल शोधण्यासाठी सर्व आरोपांचे पुन्हा एकदा रिमांड घ्या. मोबाईलमध्ये मोठे पुरावे, ते नष्ट करण्यासाठीच मोबाईल गायब करण्याचे षडयंत्र आहे. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची केली मागणी.

Namdeo Kumbhar

विष्णू चाटेचा मोबाईल सापडत नसल्याच्या प्रकरणात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु केवळ गुन्हा दाखल करून भागणार नाही तर त्या मोबाईलमध्ये असलेले पुरावे नष्ट झाल्यास त्याची जबाबदारी पोलीस प्रशासन घेणार का? असा सवाल उपस्थित करत धनंजय देशमुख यांनी या मोबाईलच्या शोधासाठी सर्व आरोपींचे पुन्हा एकदा रिमांड घ्या आणि मोबाईल शोधून काढा अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

विष्णू चाटे याचा मोबाईल संतोष देशमुख यांची हत्या होऊन 58 दिवस झाले, तरी अद्याप पोलीस यंत्रणेला सीआयडीला सापडलेला नाही. यामुळे या मोबाईलमध्ये नेमके काय होते? असा प्रश्न कायम असून त्याचा शोध घेण्यासाठी आता पुन्हा एकदा या सर्व आरोपींची रिमांड घ्यावे, अशीच मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे आज देवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यातच असून ते या प्रकरणावर काही भाष्य करतात का? हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

SCROLL FOR NEXT