Ajit Pawar plane crash saam tv
Video

मोठी बातमी! बारामती विमान अपघातानंतर DGCAची कठोर कारवाई, रेडबर्ड एअरवेजसह १४ ऑपरेटर्सचे विशेष ऑडिट

Ajit Pawar Death: बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. या विमान अपघातामध्ये एकूण ५ जणांनी आपले प्राण गमावले होते. या विमान अपघातानंतर आता DGCAने कठोर कारवाई केली आहे.

Priya More

बारामती विमान अपघातानंतर कडक पावले उचलण्यात आली आहेत. रेडबर्ड एअरवेजसह १४ ऑपरेटर्सचे विशेष ऑडिट करण्यात आले. २ फेब्रुवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने चार्टर्ड विमान कंपन्यांवर कठोर कारवाई करत विशेष ऑडिटचे आदेश दिले आहेत. या कारवाईच्या पहिल्या टप्प्यात एकूण १४ ऑपरेटर्स जे चार्टर विमान आणि हेलिकॉप्टर सेवा देतात यांचे ऑडिट करण्यात आल्याचे सांगण्यात आलं आहे. याच प्रक्रियेत रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेडचे देखील विशेष ऑडिट पूर्ण झाले आहे. हे ऑडिट DGCA च्या तीन सदस्यीय टीमद्वारे करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, बारामती विमानतळाजवळ राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान कोसळले होते. या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला होता. या विमान अपघाताचा तपास केला जात आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला यामागचे कारण अद्याप समोर आले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

Gold Price Today : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, प्रति तोळा इतक्या रुपयांनी स्वस्त; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दर

Thigh size: मांडीचा आकार सांगतो तुम्ही किती वर्षे जगणार? नव्या संशोधनातील धक्कादायक खुलासा

गुरुपौर्णिमा का साजरी करतात? जाणून घ्या यामागची जुनी परंपरा आणि इतिहास

Sugar Stock : साखर दर नियंत्रणासाठी सरकारचा मोठा निर्णय, व्यापार्‍यांवर घातले निर्बंध, आता इतकाच साठा ठेवता येणार

SCROLL FOR NEXT