मराठवाडा दुष्काळावरून फडणवीस विरुद्ध ठाकरे  saam tv
Video

Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray : दुष्काळावरून फडणवीस-उद्धव ठाकरे आमनेसामने, कोण काय म्हणालं? पाहा व्हिडिओ

Marathwada Drought: मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे आमनेसामने आले. फडणवीसांच्या आश्वासनावर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Nandkumar Joshi

मराठवाड्यातील दुष्काळावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरेसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंमध्ये जुंपलीय. मराठवाड्यातील पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही असं मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणालेत. त्यावर फडणवीस तुमचा भाजप पुढची सत्ता पाहणार नाही अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी समाचार घेतलाय.

मराठवाड्यातील या पिढीने दुष्काळ पाहिला आहे. पण पुढच्या पिढीला आपल्याला दुष्काळ पाहू द्यायचा नाही हा संकल्प आपण केला आहे. त्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. लवकरच तो दिवस पाहायला मिळेल. ज्या दिवशी छत्रपती संभाजीनगरात प्रत्येक घरी दररोज पिण्याचे पाणी येईल, त्या दिशेने आपली वाटचाल वेगाने सुरू झाली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. त्यावर ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. पुढची पिढी दुष्काळ बघणार नाही, असे मुख्यमंत्री सांगत आहेत, पण जोपर्यंत मराठवाडा ठरवत नाही की फडणवीस तुमचा भाजप पुढच्या निवडणुकीनंतर सत्ता बघणार नाही, तेव्हा ते कुठे आतापासून कामाला लागतील, असं ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guava Leaves Benefits for Eye Stye : डोळ्याला रांजणवाडी आली असेल तर पेरूच्या पानांचा सोपा उपाय करा; मिळेल त्वरित आराम

कोल्हापुरात प्रेमसंबंधातून थरारक घटना; अपहरण केलं नंतर प्रेयसीला खोल दरीत ढकललं!

Raw Garlic Benefits: सकाळी कच्चा लसूण खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात?

ज्ञानेश कुमार राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, CJPचे प्रमुख नेते ताब्यात, अंजिक्य शिंदेंकडे नेतृत्व

Bathroom Mirror Benefits: बाथरूममध्ये आरसा असण्याचे फायदे काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT