DEVENDRA FADNAVIS RESIGN DEMAND | MPSC PAPER LEAK PROTEST IN PARLIAMENT saam tv
Video

देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या! थेट संसदेबाहेर खासदारांच्या घोषणा; कारण काय? VIDEO

MPSC Paper Leak Protest Outside Parliament: MPSC पेपरफुटी प्रकरणामुळे राजकारण तापलं असून संसदेबाहेर विरोधकांनी जोरदार आंदोलन करत देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित करत सरकारवर तीव्र टीका करण्यात आली.

Omkar Sonawane

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) पेपरफुटी प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर संसदेबाहेर विरोधकांनी जोरदार निदर्शनं करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. "देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या" अशा घोषणा देत विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. संसदेबाहेर झालेल्या या आंदोलनात महाविकास आघाडीचे खासदार सहभागी झाले होते. हातात फलक घेऊन आणि सरकारविरोधी घोषणा देत त्यांनी MPSC पेपरफुटी प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त केला. "पेपर फोडणाऱ्या सरकारचा निषेध असो", "विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारे सरकार हद्दपार झाले पाहिजे" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. लोकसभेचे अधिवेशन सुरू झाल्यापासून अजून एक दिवसही दोन्ही सभागृहामध्ये कामकाज पार पडले नाही. नीट पेपरफुटीच्या आंदोलनात आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याने विरोधकांनी यावर चर्चा करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT