फडणवीस saam tv
Video

Devendra Fadnavis: हिंदी भाषेला का विरोध करत आहे? याचं मला आश्चर्य वाटतं, फडणवीस काय म्हणाले? VIDEO

Language Controversy: राज्यात पहिली पासून हिंदी भाषा अनिर्वाय करण्याच्या निर्णयाने नाराजी असताना आता राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतला आहे. राज्यात आता हिंदी भाषेला इतर पर्यायी भाषा घेण्याची मुभा असणार आहे असे फडणवीस म्हणाले.

Omkar Sonawane

महाराष्ट्र राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यामुळे मनसे आणि ठाकरे गटाने हिंदी भाषेची सक्ती करण्यास विरोध केला होता. उद्धव ठाकरेंनी देखील हिंदी भाषा शिकायला काहीच हरकत नाही. परंतु त्याची जबरदस्ती नको अशी भूमिका मांडली होती. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, हिंदी भाषेचे शिक्षक मुबलक असल्याने हिंदी भाषेची आम्ही निवड केली होती. मात्र, आता हिंदी ऐवजी दुसरी कोणतीही भाषा निवडण्याचा पर्याय दिला जाईल. तसेच तिसरी भाषा शिकायची असेल. आणि त्या भाषेकरिता किमान २० विद्यार्थी असेल तर वेगळा शिक्षक देता येईल असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

सीमावरती भागात अनेक भाषेचे शिक्षक असतात. तिथे द्विभाषा शिक्षक उपलब्ध असेल तर काही हरकत नाही. मात्र, निवडलेल्या भाषेसाठी तर किमान 20 विद्यार्थी उपलब्ध नसतील तर तेथे स्वतंत्र शिक्षक देता येणार नाही. मग तिथे ऑनलाईन पद्धतीने किंवा अन्य पद्धतीने शिकवण्याचा विचार सुरू आहे. महाराष्ट्रात मराठीची सक्ती असणारच आहे. असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. हिंदी भाषा आपल्या मातीतली भाषा आहे. याचा आपल्याला दूस्वास का वाटतोय हे मला कळत नाही. लोक परकीय भाषा असलेल्या इंग्रजीला विरोध करत नाही. पण हिंदी भाषेला का विरोध करत आहे. याचे मला आश्चर्य वाटते असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News: कडाक्याच्या थंडीमुळे २२ वर्षाच्या तरूणाचा मृत्यू, नाशिकमध्ये हळहळ

Wedding Shopping : आली लगीन सराई....लग्नासाठी शॉपिंग करताय? मग मुंबईतील या प्रसिध्द ठिकाणी नक्कीच जा

Historical Places In Maharashtra : अहिल्यानगरमधील 'या' किल्ल्यावर झाली इतिहासातील महत्त्वाची लढाई, लहान मुलांसोबत नक्की जा

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

SBI ATM Charges: स्टेट बँकेचा ग्राहकांना झटका! ATM मधून पैसे काढणे आता महागलं; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT