Devendra Fadanvis SaamTv
Video

Devendra Fadnavis News : भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब

BJP Party Group Leader : विधानभवनात भाजपा आमदारांची कोअर कमिटीची बैठक आज पार पडली. यावेळी भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाली आहे.

Saam Tv

भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. भाजपने त्यांचा नेता ठरवला असून आज अखेर गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. बुधवारी विधानभवनात भाजपा आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 11 दिवसांनी आज भाजपची कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. विधीमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी भाजपचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.

दरम्यान, आज दुपारी महायुतीमधील नेते राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करणार असून 5 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

Tejaswini Pandit : "दोन भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येतायत यापेक्षा मोठं काहीच नाही", तेजस्विनी पंडित हीची भावनिक प्रतिक्रिया | VIDEO

Buldhana: क्रूरतेची परिसीमा! शेतीच्या वादातून ६० वर्षीय व्यक्तीची हत्या, मृतदेह छिन्नविछन्न अवस्थेत आढळला

SCROLL FOR NEXT