Devendra Fadnavis tests India’s first swappable battery heavy-duty electric truck at Blue Energy Motors inauguration. Saam Tv
Video

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चालवला ट्रक पाहा VIDEO

Blue Energy Motors Heavy-Duty EV Truck Launch: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्ल्यू एनर्जी मोटर्सच्या भारतातील पहिल्या स्वॅपेबल बॅटरी असलेल्या हेवी ड्युटी इलेक्ट्रिक ट्रकचा शुभारंभ केला.

Omkar Sonawane

ब्ल्यू एनर्जी मोटर्स निर्मित स्वॅपेबल बॅटरी असलेला इलेक्ट्रिक ट्रक म्हणजे ‘रिव्होल्यूशन ऑन व्हील’ असून त्यातील तंत्रज्ञान आणि कार्यक्षमता लक्षात घेता येत्या काळात या क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विस्तार होईल. राज्य शासन मुंबई- पुणे इलेक्ट्रीक कॉरिडोअरसारखे अन्य कॉरिडोर करण्यासाठी सर्व सहकार्य करेल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. निघोजे येथील ब्ल्यू एनर्जी मोटर्स ईव्ही ट्रकच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार अमित गोरखे, महेश लांडगे, बाबाजी काळे, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, ब्ल्यू एनर्जी मोटर्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध भुवलकर, धीरेंद्र शास्त्री बागेश्वरबाबा, प्रशांत रुईया, अंशुमन रुईया, अमित बाजाज, कौस्तुभ धवसे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी चालवली ट्रक

ब्लू एनर्जी मोटर्सतर्फे निर्मित स्वॅपेबल बॅटरी हेवी इलेक्ट्रिक ट्रक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीच्या आवारात चालविला. नवं तंत्रज्ञान समजून घेताना ते हाताळण्याचे कसबही मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले.

तत्पूर्वी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते ब्लू एनर्जी मोटर्सतर्फे निर्मित भारताच्या पहिल्या स्वॅपेबल बॅटरी असलेल्या हेवी ड्युटी इलेक्ट्रिक ट्रकचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कंपनीच्या मुंबई–पुणे इलेक्ट्रिक कॉरिडॉरचे उद्घाटनही करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT