Nawab Malik News SaamTv
Video

Devendra Fadanvis : फडणवीसांनी स्पष्ट केली मलिकांबाबत भाजपची भूमिका; म्हणाले, 'आम्ही त्यांना ..' | VIDEO

Mankhurd - Shivajinagar Assembly Constituency : मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून महायुतीने शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार दिला असताना देखील नवाब मलिक हे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटातून लढण्यास इच्छुक आहेत. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीची आणि भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे.

Saam Tv

शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघात भाजप नवाब मलिक यांचा प्रचार करणार नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. नवाब मलिक यांच्या विरोधात उभे असलेले महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असून त्यांचाच आम्ही प्रचार करू असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे मानखुर्दमध्ये आता महायुतीचेच उमेदवार आमनेसामने आल्याचं विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. 'आम्ही नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही, याबद्दल आम्ही अधिकृत घोषणा देखील केली आहे. मानखुर्दमध्ये महायुतीने शिंदे गटाचा उमेदवार दिला आहे. आम्ही त्याचा प्रचार करू.' असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे.

दरम्यान, फडणवीसांच्या या वक्तव्यावर नवाब मलिक यांनी देखील आता उत्तर दिलं आहे. 'फडणवीस यांनी प्रचाराला यावं किंवा पाठिंबा द्यावा असा आग्रह नाही, त्यांचा विरोध राहणार आहेच.' असंही मलिक यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे आता मानखुर्दमध्ये सरळ महायुतीतच लढत रंगणार आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT