Devendra Fadanvis Rally SaamTv
Video

Devendra Fadanvis : महाराष्ट्राने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवलाय; अभूतपूर्व विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

Assembly Election 2024 Results : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचा आज निकाल जाहीर झाला. यात महायुतीला अभूतपूर्व असा विजय मिळाला आहे. या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जल्लोष साजरा करण्यात आला.

Saam Tv

लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फेक नरेटीव्हला आम्ही योग्य उत्तर देऊ शकलो नाही. त्यामुळे या महाराष्ट्रात आम्हाला आवश्यक असलेले यश मिळालं नाही. हा संपूर्ण देश नरेंद्र मोदी यांच्या सोबत असताना आम्ही चुकलो हे दुःख आम्हाला होतं. देश मोदींसोबत जात असताना महाराष्ट्रात त्यांना अपेक्षित पाठिंबा मिळवून देऊ शकलो नाही. त्याच वेळेस आम्ही या फेक नरेटीव्हला उत्तर देण्याचे आम्ही ठरवलं होतं आणि आता तसं उत्तर देऊन दाखवलं, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. राज्यातील अभुतपूर्व विजयानंतर प्रदेश भाजपच्या मुख्यालयात देवेंद्र फडणवीस यांचा पक्षाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या विजयाकरीता ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं, त्या सर्व कार्यकर्त्यांचे देखील यावेळी त्यांनी आभार मानले. महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवला असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आम्ही मोदींच्या पाठीशी असल्याचं महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलं, असं देखील ते म्हणाले. महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही साष्टांग दंडवत घालत असल्याचं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे. ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीला आणि भारतीय जनता पक्षाला मोठा आशीर्वाद दिला, त्या सर्वांचे देखील आम्ही आभार मानत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT