भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
माणसांची कामं हलकी करण्यासाठी AI तंत्रज्ञान आलं. मात्र हेच तंत्रज्ञान लाखो कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. याच AI तंत्रज्ञानाचा पहिला फटका कंम्प्युटर आणि लॅपटॉप बनवणाऱ्या डेल कंपनीच्या 12 हजार 500 कर्मचाऱ्यांना बसलाय आणि त्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड कोसळलीय.
डेल AI आधारित सेल्स युनिट बनवणार. त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसणार आहे
AI ऑटोमेशन आणि रिपीटिशनच्या कर्मचाऱ्यांना रिप्लेस करु शकतं. त्यामुळे नोकऱ्या जाण्याचा धोका.
कस्टमर सर्विस, फूड सर्विस आणि ऑफिस सपोर्ट स्टाफ च्या नोकऱ्यांना धोका.
2030 पर्यंत कोट्यावधी लोकांच्या नोकरीवर कुऱ्हाड कोसळण्याचा अंदाज.
कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता.
कंम्प्युटर आणि लॅपटॉप बनवणाऱ्या डेल कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांची पुनर्गठन करणार असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे कंपनीच्या 10 टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार असल्याची माहिती पुढे आलीय. तर जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजेंसमुळे लाखो नोकऱ्यांवर गंडांतर येण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवलाय. त्यामुळे या AI मुळे नोकरी जाण्याची शक्यता असल्याने टेंशन वाढलं असलं तरी तुम्ही AI तंत्रज्ञानासोबत स्वतःला बदलून अपग्रेड होणं महत्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.