Shirdi-bound flight circles mid-air before being safely diverted to Surat amid bad weather conditions. Saam Tv
Video

दिल्लीहून शिर्डीकडे येणारे विमान भरकटलं; हवेतच घिरट्या, नागरिकांची धावपळ|VIDEO

Delhi To Shirdi Flight Diverted Due To Bad Weather: दिल्लीहून शिर्डीकडे जाणारे विमान खराब हवामानामुळे शिर्डीत उतरू शकले नाही. हवेत घिरट्या घालत असताना नाशिकच्या येवला भागात कमी उंचीवर उड्डाण केल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली.

Omkar Sonawane

अजय सोनवणे, साम टीव्ही

दिल्लीहून शिर्डीच्या दिशेने निघालेले विमान हे सोमवारी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास शिर्डीमध्ये लँड होणार होते. मात्र खराब हवामानामुळे लँडिंगची परवानगी न मिळाल्याने विमान हवेतच घिरट्या घालत होते. घिरट्या घालत असताना हे विमान नाशिकच्या येवला तालुक्यातील पूर्व भागाच्या हवाय यादीतून अतिशय कमी उंचीवर असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. आपत्कालीन यंत्रणेला फोन केल्यामुळे पोलीस आणि महसूल प्रशासनाची एकच धावपळ उडाली. येवला प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे आणि तालुका संदीप मंडलिक यांनी तात्काळ शिर्डी एटीसी व नाशिक एटीसी यांच्याशी संपर्क करून माहिती घेतली असता सदर विमानाची इमर्जन्सी लँडिंग सुरत विमानतळावर करण्यात आल्यानं विमानातील प्रवाशांसह येवला तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जळगावातील ग्रामीण भागात एलपीजी संकट, गॅस पंपावर ऑटो रिक्षा चालकांची गर्दी

Blood Pressure: ब्लड प्रेशर तपासताना या चूका करणं लगेचच थांबवा, डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Ashok Kharat: खरात प्रकरणामुळे अजित पवार गटातील आणखी एक महिला नेत्या विरोधकांच्या रडारवर; राजीनाम्याची केली मागणी

Elphistone Bridge: मध्य रेल्वेवर ६ दिवस मेगा ब्लॉक; लोकलचं वेळापत्रक बदलणार; तुमच्यावर काय परिणाम होणार?

IPL 2026: पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; चेन्नईची थेट सहाव्या स्थानावर, पहिल्या नंबरवर कोण?

SCROLL FOR NEXT