'कॉक्रोच जनता पार्टी' पुन्हा एकदा दिल्लीच्या रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या अटकेच्या निषेधार्थ CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आज संध्याकाळी ५:०० वाजता 'तिरंगा मार्च' काढण्याची घोषणा केली. आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांनी दीपकेंना ताब्यात घेतलंय. सकाळी पोलिसांनी दीपके यांना त्यांच्या घरी जाऊन नोटीस दिली होती. त्यानंतरही दीपके आंदोलनासाठी सेंट्रल पार्कला निघाले होते. त्याचवेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. या आंदोलनाला आम आदमी पार्टी (AAP) तसेच डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटना - AISA आणि SFI - यांचाही पाठिंबा मिळाला. CJP च्या या 'तिरंगा मार्च'च्या घोषणेनंतर कनॉट प्लेस परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. दिल्ली वाहतूक पोलिसांनी यासंदर्भात एक वाहतूक सल्ला (ट्रॅफिक ॲडव्हायझरी) देखील जारी केलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.