Delhi Police action ahead of the ‘Lehra Do Tiranga’ protest; Neha Bora was reportedly detained saam tv
Video

दिपकेंनंतर दिल्ली पोलिसांनी नेहा बोरालाही घेतलं ताब्यात; कनॉट प्लेसवर आंदोलकांची तुफान गर्दी

Neha Bora Detained : ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतल्यानंतर नेहा बोरालाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आयसा आणि डाव्या पक्षांकडूनही आंदोलन करण्यात येत आहे.

Bharat Jadhav

दिल्ली पोलिसांनी 'सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतल्यानंतर नेहा बोरालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कॉक्रोच जनता पक्षाकडून कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा आंदोलन पुकारलं होतं. शुक्रवारी संध्याकाळी अभिजीत दीपके आंदोलन करणार होते, त्याआधीचं दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. त्यानंतर दिल्लीच्या मंडी परिसरात AISA आणि डाव्या पक्षांकडून आंदोलन करण्यात आलं.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येत होतं. दरम्यान कनॉट प्लेसवर आंदोलक हातात तिरंगा ध्वज घेऊन मोठ्या प्रमाणात जमत आहेत. दरम्यान सीजेपी (CJP) द्वारे आयोजित 'तिरंगा रॅली आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, कनॉट प्लेस आणि परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलाय. रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) आणि इतर सुरक्षा दलांच्या जवानांनी या भागात 'फ्लॅग मार्च' करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Retirement news: 17 वर्षांची कारकिर्द, वनडेत 2 हजारांपेक्षा जास्त रन्स...! भारतीय खेळाडूची निवृत्तीची घोषणा

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी जळगावात तिरंगा रॅली

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निळं आकाश आणि बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी 'या' 5 पर्यटनस्थळांना नक्की भेट द्या

Cleaning Tips : नळांवर पांढरे डाग पडतायेत? या ट्रिक्स करा फॉलो, नळ दिसतील नवेकोरे

नागपूर ते गोवा प्रवास सुपरफास्ट! 8 तासांत पोहोचणार समुद्राच्या किनारी; 13 जिल्ह्यातून जाणार महामार्ग

SCROLL FOR NEXT