Deepak Kesarkar saam tv
Video

Maharashtra Politics: दीपक केसरकर यांचा राजकीय निवृत्तीवरुन यूटर्न; पुढचा प्लान सांगितला, म्हणाले- मी 'ती' निवडणूक...|VIDEO

Not Quitting Politics Yet: काही दिवसांपूर्वी माजी मंत्री दीपक केसरकर यांनी राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र त्यांनी आता त्या विधानावरुन यूटर्न घेतला आहे.

Omkar Sonawane

मागच्या काही दिवसांपासून मंत्री दीपक केसरकर हे कुठल्याही सभेत आणि राजकीय कार्यक्रमात दिसत नव्हते. याचा कारण म्हणजे ते काही दिवसांपासून आजारी असल्याचे सांगितले जात होते. एका सभेमध्ये माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी आपण राजकीय निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, ते वक्तव्य मे गमतीने केले होते असे म्हणत या घोषणेवरून की केसरकर यांनी यूटर्न मारला आहे. आगामी काळात राज्यसभा किंवा विधान परिषदेचे निवडणूक लढवण्याची क्षमता आपली आहे असेही ते म्हणाले.

फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदं न मिळाल्याने ते नाराज असल्याचे देखील सांगितले जात होते पण मी नाराज नाही मागील अडीच वर्षे मी मंत्रीपदी होतो त्यात मी खुश आहे. मला काम करण्यासाठी आमदारकी पुरेशी आहे. इतरांनाही संधी मिळायला हवी आता माझ वय वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात कोणीतरी उठून बाजूला व्हा म्हणण्यापेक्षा आपण आधीच बाजूला झालेल चांगलं अशी प्रतिक्रिया दिली होती.

मात्र आज त्यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना म्हणाले ते वक्तव्य मी गमतीने केले होते पुढील काळात आमदारकी नाही पण राज्यसभा किंवा विधान परिषदेची निवडणूक लढण्याची आपल्या ताकद आहे. नवीन युवकांना संधी देण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे असे म्हणत राजकीय निवृत्तीच्या निर्णयावरून यांनी यू टर्न घेतला आहे. तसेच, आगामी काळात सावंतवाडी मतदारसंघातून नवीन चेहरा देऊ मात्र विधानपरिषद किंवा राज्यसभेच्या माध्यमातून सक्रिय राहू असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MS Dhoni आयपीएलच्या किती सामन्यांना मुकणार? का असणार संघाबाहेर?

Bihar Politics: राजकारणातील सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देणार CM पदाचा राजीनामा

अमेरिकेत ट्रम्पविरोधात 'नो किंग्स' आंदोलन; 90 लाख नागरीक उतरले रस्त्यावर, कारण काय?

'वेलकम टू हेल' इराणचा अमेरिकेला इशारा, इराणची धमकी, जगाला धडकी

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची पुन्हा चर्चा, दादांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाची ऑफर

SCROLL FOR NEXT