पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका गर्भवती महिलेला जीव गमवावा लागला. पैशांअभावी हॉस्पिटलने गेटवरूनच गर्भवतीला परत पाठवल्याने आणि एनवेळी रुग्णवाहिका मिळू न शकल्यामुळे महिलेचा नाहक बळी गेला. ज्या महिलेचा मृत्यू झाला ती महिला विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांची ती पत्नी होती.
आज या घटनेच्या निषेधार्थ पुणे येथील सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलन करत घोषणाबाजी केली. तसेच संतप्त शिवसैनिकांनी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांवर चिल्लर फेकत संताप व्यक्त केला. या रुग्णालयावर कडक कारवाई करावी अशी मागणी सर्वत्र होत आहे. विशेष म्हणजे गर्भवती महिलेला रुग्णालायत दाखल करून घ्या असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून सांगून देखील त्यांच्या या आदेशाला न जुमानता हॉस्पिटल प्रशासनाने महिलेला तडफडत ठेवले आणि तिचा मृत्यू झाला असे आंदोलकांनी सांगितले. सदर प्रकरणाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेतली असून जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे आणि दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.