om birla ,Uddhav Thackeray and Eknath Shinde saam tv
Video

ठाकरेंच्या ६ बंडखोर खासदारांबाबत पावसाळी अधिवेशनापूर्वी निर्णय?

Shiv Sena split : ठाकरे सेनेच्या ६ बंडखोर खासदारांसह तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांच्या गटाबाबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला पावसाळी अधिवेशनापूर्वी निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Nandkumar Joshi

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ६ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. ठाकरे सेनेच्या बंडखोर खासदारांच्या प्रकरणावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच अंतिम निर्णय देण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी नुकतीच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. तत्पूर्वी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या ६ बंडखोर खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत सहभागी होण्याबाबत ओम बिर्ला यांना पत्र दिले होते. लोकसभा सचिवालयात यावर कायदेशीर तज्ज्ञांसोबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर आता ओम बिर्ला हे अंतिम निर्णय काय देतात याकडं सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. आम्ही लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. संवैधानिक तरतुदींचा दाखला देतानाच आमची बाजू त्यांच्यासमोर मांडली. जोपर्यंत मूळ पक्ष अन्य कोणत्या राजकीय पक्षात विलीन होत नाही आणि त्या विधीमंडळ पक्षाच्या दोन तृतीयांश सदस्यांची सहमती होत नाही, तोपर्यंत विलीनीकरण मान्य केला जाऊ शकत नाही ही बाजू आम्ही जोरकसपणे मांडली, असे देसाई यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गोकुळमध्ये मोठा राजकीय भूकंप! कोरमच्या तिढ्यामुळे सत्तासंघर्ष टोकाला; हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्याने खळबळ

Maharashtra News Live Update: फडणवीस-शिंदे पवारांच्या भेटीसाठी रूग्णालयात दाखल

High Blood Pressure: ग्रामीण भागात 3 पैकी 1 व्यक्ती हाय ब्लड प्रेशरचा त्रास; 25 टक्के लोकांना आजाराची माहितीच नाही, टाटा मेमोरियलच्या अभ्यासातून धक्कादायक माहिती

Maharashtra Politics: अजितदादांच्या पक्षात उलथापालथ होण्याची शक्यता, राज्यातील बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

DA Hike 2026 : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News! DA थेट १८% वर; जुलैपासूनची थकबाकीही मिळणार

SCROLL FOR NEXT