Devendra Fadanvis SaamTv
Video

Devendra Fadanvis : गृहमंत्री व्हावं, पण स्वत:च्या घरचं; फडणवीसांचा विरोधकांना मिश्किल टोला!

Devendra Fadanvis Road Show In Nagpur : नागपूरच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोचा दूसरा टप्पा पार पडला. मनीष नगर ते त्रिशरण चौक असा हा रोड शो झाला.

Saam Tv

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज नागपूरमध्ये रोड शो पार पडत आहे. नागपूरच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघात आज दुसऱ्यांदा हा रोडशो झाला. मनीष नगर परिसर ते त्रिशरण चौकापर्यंत हा रोड शो झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ते यावेळी सहाव्यांदा निवडून येतील आणि नागपूरचा अजून विकास होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. गृहमंत्री पदावर मविआच्या अनेक नेत्यांचा डोळा आहे, असा प्रश्न माध्यमांनी विचारल्यावर 'त्यांनी गृहमंत्री नक्कीच व्हावं, पण आपल्या घरी आमच्या वहिनींचं गृहमंत्री व्हावं', असा मिश्किल टोला फडणवीस यांनी यावेळी विरोधकांना लगावला.

प्रचार सभा आणि रोड शो रॅली असा धडाका सध्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांकडून सुरू आहे. आज उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नागपूर दक्षिण पश्चिमचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या रोड शोचा दूसरा टप्पा पूर्ण केला. मतदारसंघातील जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा या रोड शो मधून प्रयत्न करण्यात आला. 'दक्षिण पश्चिम मतदारसंघ माझा परिवार आहे. मी जे काही आहे ते यामुळेच आहे. यावेळी देखील मला माझ्या परिवाराची साथ मिळेल, असा मला विश्वास आहे. तुमचा परिवार तुमच्या मागे असेल तरच तुम्हाला जगाशी लढता येतं,' असं म्हणत फडणवीस यांनी पुन्हा एकदा निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. पुढे बोलताना फडणवीस यांनी, 'परिवर्तन एकटा व्यक्ति घडवत नाही, परिवर्तन जनता घडवत असते. यावेळी महायुतीचच सरकार येईल अशी मानसिकता राज्यातील जनतेने बनवली आहे.' असं म्हणत शरद पवार यांच्यावर टीका केली.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT