Devendra Fadanvis News SaamTv
Video

VIDEO : मविआ ही कोविडच्या काळात मलिदा खाणारी गॅंग; फडणवीस यांची घणाघाती टीका | Marathi News

Dahisar News : दहिसर विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार मनिषा अशोक चौधरी यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणं काय असतं? हे मविआ आणि उबाठाच्या लोकांना पाहून कळत. त्यांनी कोव्हिडमध्ये खिचडी चोरीमधून टाळूवरचे लोणी खाल्लं आहे. कोव्हिडमध्ये खिचडी चोरली, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला आहे. शनिवारी दहिसर विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार मनिषा अशोक चौधरी यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, आपण ५ वर्षात ३५० किमीचं मेट्रो जाळं सुरु केलं. महायुतीचं सरकार आहे आणि गोपाळ शेट्टी, मनिषा ताईंसारखे आमदार आहेत म्हणून काम झालं. थीम पार्कचे देखील काम सुरु होणार आहे. मुंबईत २०१४-२४ मध्ये जवळपास मोदींच्या कार्यकाळात आपण परिवर्तन केलं. विकसित देश आणि महाराष्ट्र तयार करायचा असेल तर ५० टक्के माता भगिनींना सामाजिक आर्थिक केंद्र सुरु करावं लागेल. ११ लाख लखपती दीदी तयार केल्या, २०२८ पर्यंत ५० लाख लखपती दीदी तयार करणार आहोत. मविआनं वोट जिहाद यांनी सुरु केलंय, आम्ही कोणाविरोधात नाही. आम्ही मुस्लिम महिलांना देखील पैसे दिलेत, असंही यावेळी बोलताना फडणवीस यांनी म्हंटलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk and Pohe: नाश्त्याला दूध आणि पोह्याचे सेवन करणे ठरते फायदेशीर

Govinda Health Update : प्रचारसभेत असताना गोविंदाची तब्येत बिघडली, अर्धवट सभा सोडून घरी परतला

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या सभेच्या खुर्च्या रिकाम्या, पण निवडणुकीच्या दिवशी...; उद्धव ठाकरेंना नेमकी कसली भीती?

Raj Thackeray Speech : उद्धव ठाकरे यांच्या जागी मी असतो तर...; राज ठाकरे स्पष्टच बोलले,VIDEO

Ranveer Singh: रणवीर सिंह निभावतोय डॅडी ड्युटीज; आनंद व्यक्त करताना अभिनेत्याला शब्द सुचेना

SCROLL FOR NEXT