Maharashtra government investment agreements at Davos 2026 Saam TV Marathi
Video

यावर्षी किती लाख कोटींचे सामंजस्य करार होणार? थेट दावोसहून उदय सामंत EXCLUSIVE

Maharashtra government investment agreements at Davos 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दावोस दौऱ्यात महाराष्ट्रासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक अपेक्षित आहे.

Namdeo Kumbhar

CM Devendra Fadnavis Davos industrial investment plan : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत दावोस दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्योग आणि रोजगार उपलब्ध करण्यासाठी हा दावोस दौरा महत्त्वाचा आहे. दावोस दौऱ्यावर असलेले उद्यागमंत्री उदय सामंत यांच्यासोबत साम टीव्हीचे संपादक निलेश खरे यांनी संवाद साधला. उद्योगमंत्र्यांनी साम टीव्हीसोबत बोलताना महाराष्ट्रासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक आणि सामंजस्य करार होतील. मागील वर्षाचा विक्रम मोडीत काढला जाईल, असे सांगितले.

गेल्या वर्षी आम्ही १६ लाख कोटींचे सामंजस्य करार केले होते. यंदाच्या दावोस दौऱ्यात आम्ही आमचाच विक्रम मोडला आहे. यंदा नक्कीच १६ लाख कोटींपेक्षा जास्त सामंजस्य करार केले जातील. यामधून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात व्यावसाय, उद्योग अन् नोकऱ्या उपलब्ध होतील, असा विश्वास सामंत यांनी साम टीव्हीसोबत बोलताना केला.

एमएमआरडीए, सिडको, रिअल इस्टेट, डेटा सेंटर, डिफेंस सेंटर यासारख्या विविध क्षेत्रात सामंजस्य करार केले आहेत. मागील वर्षी केलेल्या सामंजस्य करार ७० टक्के झालेले आहेत. राज्यातील विविध भागात रोजगार आणि व्यवसाय उपलब्ध होणार आहेत, असेही सामंत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT