Dattatray Bharane addressing farmers and women at the launch of the ‘Affordable Women – Empowered Family’ campaign in Bhigwan. Saam Tv
Video

कर्जमाफी कधी होणार? दत्ता भरणेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं नाव घेत थेट उत्तरच सांगितलं, म्हणाले...VIDEO

Dattatray Bharane Farm Loan Waiver Announcement: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भिगवणमध्ये ‘स्वस्त नारी – सशक्त परिवार’ अभियान सुरू केले.

Omkar Sonawane

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भिगवण येथे विविध कार्यक्रमात भाग घेतला आणि शेतकरी, आरोग्य व स्थानिक विकासाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले.

स्वस्त नारी – सशक्त परिवार अभियानाची सुरुवात

भरणे यांनी महिलांच्या आरोग्यावर भर देत स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाची भिगवणमध्ये सुरूवात केली. या कार्यक्रमात स्त्रियांच्या विविध आजारांची तपासणी केली जाईल. त्यांनी सांगितले की, घरातील स्त्रीचे आरोग्य चांगले असल्यास संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य सुधारते, म्हणून या अभियानाला हे नाव देण्यात आले आहे.

अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांचे नुकसान

भरणे यांनी राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या मोठ्या नुकसानावर भाष्य केले. ते म्हणाले की, शेतकऱ्यांची काही चूक नाही हा निसर्गाचा आपत्तीचा प्रकार आहे. या महिन्यात बीड जिल्ह्यात सुमारे सहा लाख एकर पिकांचे नुकसान झाले आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर अहिल्यानगरचा समावेश आहे. काही ठिकाणी मानवहानी देखील झाली आहे. शासनाच्या वतीने पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाईची मदत दिली जाईल. भरणे यांनी आश्वासन दिले की, दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना मदत मिळेल. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन, राज्य सरकार त्यांच्या आर्थिक पाठबळासाठी योग्य वेळी निर्णय घेईल. कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील. असे दत्ता भरणे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharshtra Politics: विधानसभा निकालानंतर काँग्रेसने घेतला स्वबळाचा निर्णय, महाविकास आघाडीला धक्का

Maharashtra Live News Update: नाभिक, धोबी समाजाला एससीमधून आरक्षण द्या- लक्ष्मण हाकेंची मागणी

Chabahar vs Gwadar port: अमेरिकेचे चाबहार बंदरावर निर्बंध; भारताच्या ५०० मिलियन डॉलर्स गुंतवणुकीला तगडा फटका

Maharashtra Politics: निवडणुकीसाठी 3 कोटी आणि 100 बोकडं निवडणूक खर्चावरुन आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान

Monday Horoscope : नवदुर्गाची कृपा होणार, मनासारख्या घटना घडणार; ५ राशींच्या लोकांना धनलाभाचा योग

SCROLL FOR NEXT