Devotees witness the grand Maha Aarti of Dagdusheth Ganpati during Pune Ganesh Visarjan 2025 Saam Tv
Video

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

Pune Police Performing Aarti Of Dagdusheth: मुंबईच्या गिरगाव चौपाटीपासून पुण्याच्या दगडूशेठ गणपती मिरवणुकीपर्यंत गणेश विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. भव्य मिरवणुका, महाआरती आणि उजळणारी विद्युतरोषणाई यामुळे भाविक मंत्रमुग्ध झाले आहेत.

Omkar Sonawane

मुंबईतील गिरगाव चौपाटी व पुण्यात गणेश विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचला.

दगडूशेठ गणपतीची महाआरती पुणे पोलिसांच्या वतीने पार पडली.

भव्य मिरवणुका व विद्युतरोषणाईमुळे सोहळ्याची शोभा वाढली.

पावसाच्या सरी असूनही भाविकांचा उत्साह कायम राहिला.

मुंबईतील गिरगाव चौपाटी आणि पुणे येथे गणेश विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे. गिरगावच्या समुद्रकिनारी एकीकडे अरबी समुद्राची लाटं आणि दुसरीकडे भक्तांचा सागर असं अद्भुत दृश्य पाहायला मिळत आहे. भव्य मूर्ती, आकर्षक देखावे आणि मिरवणुकांमुळे संपूर्ण चौपाटी गजबजलेली आहे. दिवसभर रिमझिम पावसाची साथ असूनही गणेशभक्तांच्या आनंदात कोणतीही कमी न होता उलट तो अधिक दुणावला आहे.

दरम्यान पुण्यात, दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती पुणे पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे. मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर सर्वांचे लक्ष दगडूशेठच्या रथ मिरवणुकीकडे वळते. ही भव्य मिरवणूक पुणेकरांसाठी नेहमीच आकर्षण ठरते, तर संध्याकाळी उजळणारी विद्युतरोषणाई या सोहळ्याची शोभा अधिकच वाढवते. मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणी विसर्जनाची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध आणि सुनियोजित पद्धतीने सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT