dadar station man tries to kill himself twice cctv saam tv
Video

धक्कादायक! दादर रेल्वे स्थानकात प्रवाशाचा दोनदा आत्महत्येचा प्रयत्न, VIDEO

Dadar Railway Station : दादर रेल्वे स्थानकात थरारक घटना घडलीय. एका प्रवाशानं स्वतःनेच चाकूने वार केले. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Nandkumar Joshi

मयूर राणे, दादर | साम टीव्ही

मुंबईतील सर्वाधिक गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकात धक्कादायक घटना घडली. एका प्रवाशानं स्वतःवरच चाकूने वार केले. त्यानंतर त्याने रेल्वेखाली उडी मारण्याचा प्रयत्न केला.

दादरच्या फलाट क्रमांक १२ वर हा धक्कादायक प्रकार घडला. संबंधित प्रवाशानं आधी स्वतःवर चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. फलाटावरील होमगार्डमुळे त्याचा हा प्रयत्न फसला. बराच वेळ त्यांनी या प्रवाशाला रोखले. मात्र, आक्रमक झालेला प्रवासी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यानं स्वतःवर चाकूने वार केल्यानंतर पुन्हा त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला.

दादर रेल्वेस्थानकात एक्स्प्रेस गाडी येत असताना त्यानं बघितलं. होमगार्डची नजर चुकवून त्यानं त्या दिशेने धाव घेतली आणि रेल्वेखाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीही प्रसंगावधान राखून होमगार्डने त्या प्रवाशाला अडवलं आणि मोठा अनर्थ टळला. ही संपूर्ण घटना रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

SCROLL FOR NEXT